मौदा येथे वृक्षारोपण व पो. नि. नगराळे यांचे अभिनंदन
मौदा शहरातील मुख्य रस्त्यावरील जागृती मतिमंद निवासी शाळेच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले, विविध जातींची २५ रोपटी शिवराज प्रतिष्ठान नागपूर चे अध्यक्ष व मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत लावण्यात आली,या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील कोदामेंढी येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश देवतळे व जागृती शाळेच्या सीमा शेंडे यांनी केले होते, मौदा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक म्हणून श्री.किशोर नगराळे रुजू झाले त्यांचे हेमंत गडकरी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले व उज्वल कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी हेमंत गडकरी यांनी किशोर नगराळे यांच्या नागपुरातील पाचपावली पोलीस स्टेशन मधील आठवणींना उजाळा देत त्यांचे मौद्या सारख्या महत्वपूर्ण पोलीस स्टेशन ची जवाबदारी आल्या बद्दल अभिनंदन केले,यावेळी राजेश देवतळे, शेखर तुंडे,शेषराव भाकरे,पत्रकार दयाल नांनवटकर,दिनेश पात्रे,सुनील वैद्य व इतर उपस्थित होते




