संतापजनक 39 वर्षीय नराधमाने केला आठ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग

136

संतापजनक

39 वर्षीय नराधमाने केला आठ वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग

 

तब्बल एक महिन्यानंतर घटना आली उघडकीस

 

 

 

गडचिरोली

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे 39 वर्षीय इसमाने आठ वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना तब्बल एक महिन्यानंतर उघडकीस आली आहे.

 

ईबाकार दौलत मडावी वय वर्ष 39रा. कोनसरी ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा घरी एकटाच राहत असुन पत्नी व मुले आलापल्ली येथे राहत असल्याची महिती आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, आरोपी इबाकार दौलत मडावी याने जुलै महिन्यात घराशेजारील आठ वर्षीय पीडित मुलगी किराणा दुकानात संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास जात असताना आरोपीने खाऊच्या पैशाचे आमिष दाखवून स्वतच्या घरात नेले व तिच्यावर अतिप्रसंग केला त्यांनतर तिला या घटनेची माहिती दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलीने हा प्रकार आई वडिलांना सांगितला नाही. पंधरा दिवसांनंतर पीडित मुलीच्या पोटात दुखु लागल्याने तीला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिच्या वर थातुर मातुर उपचार केल्यानंतर तीला घरी आणले. त्यांनतरही मुलीने सदर घटनेची वाच्यता केली नाहीं. परंतु पुन्हा आठ दिवसाने पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने खासगी रूग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तीला इंजेक्शन देण्यासाठी काढल्यावर ती घाबरली व घडलेला अतिप्रसंगाचा प्रकार आई वडीलासमोर कथन केला त्यानंतर पीडित मुलीच्या आईने घाबरलेल्याअवस्थेत दिनांक 24 ऑगस्ट रोजी आष्टी पोलिस ठाण्यात पीडित मुलिसोबत घडलेला प्रकार आष्टी पोलिस ठाण्यात कथन केला त्यावरून अपराध क्रमांक 222/2023 नुसार गुन्हा दाखल करून सदर आरोपीस अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक कुंदन गावडे हे करीत आहे.