*जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर खासदार अशोक नेते यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा*

62

*जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर खासदार अशोक नेते यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा*

*प्रलंबित कामांना गती देण्याची मागणी*

दि.३० ऑगस्ट २०२३

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आणि लोकसभा क्षेत्रातील शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या काही कामांबाबत चर्चा करून त्या कामांना गती देण्याची मागणी केली.

 

गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, रोजगाराला चालना देण्यासंदर्भातील प्रकल्प, रेल्वेच्या प्रकल्पातील राज्य सरकारचा वाटा, वनविभागाच्या अडचणी, पेसा क्षेत्रातील गावे आणि ओबीसी युवकांच्या अडचणी यावरही त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निवेदन सादर केले.