*हे बंध रेशमाचे*
*जपावे या बंधनास निरामय भावनेने*
*जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने*
आज दिनांक 30/08/2023 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा *पुन्नुर* येथे सामुहिक *रक्षाबंधन* कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी सर्व मुलींनी बंधु मुलांना रक्षासुत्र बंधन केले. व मुलांनी भगीणी मुलींना रक्षाबंधन भेट म्हणून *पेन* देत रक्षावचन दिले.सर्वांनी एकमेकांना *खोबरा लाडु* भरवुन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक *न.वा.परशुरामकर* तथा शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष *श्री टिबरु पाटील गावडे* यांची विशेष उपस्थिती होती.
*निर्मळाहुनी निर्मळ नाते मुक्ताई ज्ञानाचे*
*जगी धन्य झाले नाते बहिण भाऊ प्रेमाचे*



