*आरमोरी जि. गडचिरोली येथे इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांची बैठक संपन्न*
मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या धरतीवर आरमोरी येथील कम्युनिस्ट पक्षाचे नेते अमोल मारकवार यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली. सदर बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील इंडिया अलायन्सच्या घटक पक्षांनी संघटित होऊन पुढील निवडणुका लढण्याचे ठरविले. या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, शिवसेनेचे नेते व माजी आमदार रामकृष्ण मडावी, शिवसेना उपजिल्हा संघटिका वेणूताई ढवगाये, बांधकाम सभापती सागर माने, राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर, समाजवादी पार्टीचे इलियास खान, फैजान पटेल, सलील खान पठाण व जब्बार शेख, शेकापचे युवा अध्यक्ष अक्षय कोसनकर, माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, बी आर एस पी शहराध्यक्ष प्रतीक डांगे, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, आदिवासी विकास परिषदेचे विनोद मडावी, आम आदमी पार्टीचे महादेव पोकुलवार, बी आर एस पी गडचिरोली जिल्ह्याचे प्रभारी राज बन्सोड, शिवसेनेचे ऋषी भाऊ रामटेके, माजी सभापती परसरामजी टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दिलीप घोडाम, काँग्रेसचे भैय्याजी मुद्दमवार, मुखरू चिखराम, आरमोरी काँग्रेस उपाध्यक्ष विजय सुपारे, काँग्रेसचे मनोहर बोरकर, अनिल किरमे, स्वप्निल ताडाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदाशिव भांडेकर, प्रभाकर कुबडे, भूषण सातवे, राजू ढोरे, नीलकंठ सेलोकर, ज्योतीताई घुटके, राधाताई शेंडे, ज्योतीताई सोनकुसरे सहभागी झाले.*



