ग्रामपंचायत तलोधी(मो) येथील मनमर्जी कारभारावर आळा घालण्यासाठी…प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा….
काही दिवसांपूर्वी पदोन्नती व बदली झाल्यामुळे ग्रामपंचायत तलोधी(मो)लिपिकची जागा रिक्त होती.गावातील सुशिक्षित युवकांना आस होती की जाहिरातीद्वारे ही पदभरती घेण्यात येईल त्या साठी गावातील युवक तयारीला पण लागला होता.पण ग्रामपंचायत च्या मनमर्जी कारभारामुळे कोणतीही परीक्षा सूचना न देता आधी रोजनदारी पद्धतीने कामाला घेऊन व नंतर गावकऱ्यांना कोणतीही सूचना न देता 2-3 वर्षापूर्वी कायमस्वरूपी शिपाई म्हणून घेण्यात आलेल्या शिपायाला पदोन्नती देण्यात आली असा ठराव ग्रामपंचायत कडून घेण्यात आला या साठी ग्रामसभेत निषेध नोंदविण्यात आला व लिपिक पदभरती जाहिरातीद्वारे घेण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त केली…गावकऱ्यांच्या समस्या जाणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष गावकऱ्यांच्या मदतीला धावून आला व गटविकास अधिकारी यांच्या कडे वरील होत असलेल्या विषयावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी निवेदनाद्वारे विनंती केली..त्या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार्मोशी तालुकाध्यक्ष चंद्रकांत पिपरे ,तालुका उपाध्यक्ष अंकुशभाऊ संतोषवार, सुधीर भांडेकर, शहराध्यक्ष शुभंम भांडेकर, शहरउपाध्याक्ष आकाश नेवारे, तालुका सचिव सौरभ मुनघाटे, मनविसे अध्यक्ष सांरग भांडेकर, तालुका संघटक अभिषेक कोत्तावार, मनसे सैनिक संतोष राजकोंडावर, प्रितेश गांगरेद्दीवार, मनशू सातपुते, आशिष भांडेकर,योगराज गेडाम,अंकुश रापेललीवार मिहिर पुष्टेवार, शंकर पुद्देवार,कुणाल उंदिरवाडे ई उपस्थित होते….




