*नदीपात्रात आढळलेल्या मृत नवजात अर्भक प्रकरणात मातेसह चौघाना अटक*
सतीनदीचा कुंभीटोला घाटावर मागील १७ आगस्ट रोजी पूर्ण विकसीत नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली होती या प्रकरणाचा छळा लावण्यात कूरखेडा पोलीसाना यश आले असून प्रकरणातील मूख्य आरोपी कुमारी माता सह तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहकार्य करणारी तिची आई व अन्य दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे अशी माहिती आज शनिवार रोजी कूरखेडा पोलीसानी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे
शहरात खळबळ माजविणाऱ्या या प्रकरणात यापूर्वीच नवजात अर्भकाचा कुमारी मातेची आई मंदाबाई मेश्राम (४८) रा कूरखेडा हिला अर्भकाची विल्हेवाट लावण्यात सहकार्य केल्याचा आरोपावरून अटक करण्यात येत तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे मात्र मूख्य आरोपी असलेली कूमारी माता चांदनी मेश्राम (२२) रा कूरखेडा ही घटनेचा दिवसापासून फरार होती पोलीस तिच्या मागावर होते मात्र ती पोलीसाना गुंगारा देत असल्याने तिचा ठावठिकाणा लागत नव्हता अखेर पोलीसाना तिला अटक करण्यात यश आले यावेळी तिच्या जबाबावरून नवजाताचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात सहकार्य केल्याचा आरोपावरून संतोष हर्षे (२८) रा गिलगांव ता जि गडचिरोली व दिलीप रोकडे (४०) रा कूरखेडा याना सुद्धा अटक करीत सर्व आरोपी विरोधात भादंवि ३१५,३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घटनेचा अधिक तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत



