शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन संपन्न शिवसेना महिला पदाधिकारी च्या वतीने पोलिस स्टेशन धानोरा येथे रक्षाबंधन सण पार पडला. आज दिनांक 04/09/2023 रोज सोमवारला पोलिस स्टेशन धानोरा गडचिरोली जिल्ह्या येथे, रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उध्दव साहेब ठाकरे श्री. आदित्य ठाकरें साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना महिला जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटिका सौ. आरती खोब्रागडे च्या नेतृत्वात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. पोलिस बांधव आपल्या रक्षणासाठी आपलं कुटुंब सोडून नेहमी जणतेच्या सेवेत तत्पर असतात.जणतेचे रक्षक सुद्धा सुरक्षित असावे त्यांना सुद्धा बहिनिचा आशिर्वाद असावा म्हणून मा. पोलिस निरीक्षक साहेब पोलिस स्टेशन धानोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महिला शिवसेनाच्या वतीने आज पोलिस स्टेशन धानोरा येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास शिवसेनाच्या महिला पदाधिकारी नूतन कुंभारे, जोशना राजूरकर, तसेच युवतीसेना कु. दिव्या भोयर,कृष्णाली पोटावी,तनुजा निरकर, मुस्कान बारशिंगे,दिपीका खरोडे, व संघटिका उपस्थित होत्या.




