पातागुडम पोलिसांनी अतिसंवेदनशील कोर्ला गावात साजरा केला रक्षाबंधन सण
नागरिकांना विविध जीवनाआवश्यक वस्तू तसेच लहान मुलांना शालेय साहित्याचे केले वाटप
सिरोंचा-
उपपोस्टे पातागुडम च्या अधिकारी व अमलदार यांनी अति संवेदनशील भागातील कोर्ला गावाला ग्रामभेटी दरम्यान भेट दिली तसेच रक्षाबंधन साजरा केला .उपपोस्टे पातागुडम येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड तसेच जिल्हा पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांनी नक्सलविरोधी अभियाना दरम्यान अतिसंवेदनशील कोर्ला गावाला गावाला ग्रामभेट दिली यावेळी गावातील 70 ते 80 नागरिक उपस्थित होते यावेळी ग्रामस्थाकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या अतिसवेंदन कोर्ला हे गाव इंद्रावती नदीकिनारी असून गावची ऐकून लोकसंख्या 450 ते 500च्या दरम्यान आहे पातागुडम पासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे सदर ग्रामभेट दरम्यान उपस्थित ग्रामस्थांना पोलीस अधीक्षक निलोत्पल सर तसेच अतिरिक्त पोलिस अधिक्षक यतिश देशमुख सर कुमार चिंता सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास शिंदे सराच्या मार्गदर्शना खाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना व प्रशिक्षणांबाबत माहिती देण्यात आली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. व आधार कार्ड, इश्रम कार्ड etc यावेळी माहिती देण्यात आली
उपपोस्टे पातागुडम येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड तसेच जिल्हा पोलीस अंमलदार पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांनी नक्सलविरोधी अभियाना दरम्यान अतिसंवेदनशील कोर्ला गावाला गावाला ग्रामभेट दिली यावेळी गावातील 70 ते 80 नागरिक उपस्थित होते यावेळी ग्रामस्थाकडून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या यावेळी उपस्थित गावातील महिलांनि रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी त्यांना ओवाळणी म्हणून साडी वाटप लहान मुला मुलींना दप्तर तसेच शालेय साहित्याचे वाटप पुरुषांना लुंगी वाटप तसेच विविध वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी नागरिकांनि कोर्ला हे गाव अति दुर्गम असल्यामुळे शासनाच्या योजना पोहचत नसतात याबाबत कळविले तर ग्रामस्थाच्या समश्या सोडवण्यासाठी पोलीस दल नेहमीच प्रयत्न शील राहील असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड यांनी केले सदर ग्राम भेटीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतूरवाड पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोठावळे तसेच जिल्हा पोलीस अंमलदार तसेच srpf चे अंमलदार उपस्थित होते



