तस्करांकडून 10 लाखाची देशी दारु जप्त – जिमलगट्टा पोलिसांची कारवाई

84

तस्करांकडून 10 लाखाची देशी दारु जप्त
– जिमलगट्टा पोलिसांची कारवाई
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
वाहनातून आलापल्ली ते सिरोंचा मार्गाने अवैधरित्या देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती जिमलगट्टा पोलिसांना मिळताच, सापळा रचून दहाचाकी वाहनातून 10 लाखाची दारु जप्त केल्याची कारवाई शनिवारला केली. याप्रकरणी आरोपी कैलास मडावी रा. लखनगुड्डा यास अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या छुप्या मार्गाने दारुविक्री व वाहतूक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या अवैध दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये गुरुवारला गोपनिय बातमीदाराकडुन दहाचाकी वाहनातून आलापल्ली ते सिरोंचा मार्गाने अवैधरित्या देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती जिमलगट्टा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचला. दरम्यान एक एमएच 40 सीडी 3530 क्रमांकाचे दहाचाकी माल वाहतूक करणारे संशयीत वाहन येताना दिसले. या वाहनास थांबवून तपासणी केली असता, वाहनात 10 लाख रुपये किंमतीचे देशी दारुचे 270 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी 10 लाखाची दारु व 15 लाख रुपये किंमतीचे दहाचाकी वाहन असा एकूण 25 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कैलास मडावी यास ताब्यात घेवून उपपोस्टे जिमलगट्टा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी जिमलगट्टा सुजितकुमार क्षिरसागर यांच्या नेतृत्वात जिमलगट्टाचे प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्वर बिरादार, मपोउपनि पूजा गव्हाणे, पोउपनि ज्ञानेश्वर कोल्हे, पोउपनि आनंद गिरे व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली. पुढील तपास सपोनि संगमेश्वर बिराजदार करत आहेत.
बॉक्ससाठी….
जिल्ह्यातील नागरिकांनी कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाशी संपर्क साधावा.
नीलोत्पल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली
——————————————–
16 जीएडी 28 – जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जिमलगट्टा पोलिस
——————————————–