Home Breaking News अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई जागीच ठार

214

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई जागीच ठार

 

अड्याळ ते जामगिरी मार्गांवर घडला अपघात

 

चामोर्शी

अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने गडचिरोली पोलिस दलात कार्यरत पोलिस शिपाई जागीच ठार झाल्याची घटना अड्याळ ते जामगिरी मार्गावर सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

 

प्रणय ताराचंद वाळके वय 27 वर्ष रा. मुधोली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे अपघातात मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. सदर पोलिस शिपाई आपल्या स्वगावावरून गडचिरोली कडे दुचाकीचे जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती कळताच पोलिस घटना स्थळी दाखल झाले.

Don`t copy text!