*रानटी हत्तीच्या हल्ल्यात वनकर्मचारी ठार*

91

*रानटी हत्तीच्या हल्ल्यात वनकर्मचारी ठार*

 

देसाईगंज :-

कक्ष क्रमांक ८५ डोंगरगाव हलबी या ठिकाणी मागील पंधरा दिवसांपासून २३ हत्ती वास्तव्यास असून ते हत्ती दिवसा जंगली भागात राहणे व रात्री शेतशिवरात जाऊन पिकांचे नुकसान करणे हा त्यांचा नित्यक्रम असल्याने वनविभाग सतत त्या हत्तींवर पाळत ठेवून झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ लवकरात लवकर लाभ मिळावे यासाठी वनकर्मचारी आजही दिनांक १६/०९/२०२३ रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान वडसा वनविभागाच्या कक्ष क्रमांक याठिकाणी पंचनामा करण्याकरिता गेले असता त्याठिकाणी गाडीने पोहोचणे शक्य नसल्याने चालक नामे सुधाकर आत्राम वय ५२ वर्षे या चालकासह रस्त्यावर गाडी ठेवून काही अंतरावर पंचनामा करण्यासाठी शेतशिवारात गेले असताना अचानक रानटी हत्तीने हल्ला करत असल्याचे बघून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यासोबत पळ काढला परंतु यातील मोरक्या हत्तीने वाहनमधील चालकाकडे धाव घेऊन हल्ला केला यात चालक सुधाकर आत्राम यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला परंतु महाकाय प्रण्यापुढे ते टिकले नाही व हत्तीने त्यांना जागीच ठार केले.मृतक सुधाकर आत्राम यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे घटनेचा मर्ग देसाईगंज पोलीस स्टेशन येथे दाखल केले असून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

*कर्तव्यावर असतांना एखाद्या अश्या प्रकारच्या वन्यजीवामुळे हानी झाल्यास शहीद म्हणून लाभ मिळतील यासाठी वनविभाग प्रयत्नशील राहणार आहे.*

 

*धर्मवीर सालविठ्ठल*

*विभागीय वन अधिकारी वडसा वनपरिक्षेत्र*