भाजपा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” अभियान सुरू

87

भाजपा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त “सेवा पंधरवडा” अभियान सुरू

 

 

 

 

एटापल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. या अभियानात विविध सेवा कार्यक्रम राबविले जाणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष निखिल गादेवार यांनी दिली आहे. आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी एटापल्ली जवळच असलेल्या कृष्णार येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचबरोबर मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त व्यापक प्रमाणात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेल्या महापुरूषांचे पुतळे तसेच परिसर स्वच्छ करण्याचे कार्यक्रम ही होणार आहेत. आयुष्यमान भव सप्ताहानिमित्त गरजू जनतेकरिता आयुष्मान कार्ड वाटप तसेच नोंदणी कार्यक्रमाचेही आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व, विकासाची दृष्टी, धोरणे आणि त्यांना मिळालेले यश या विषयावरील प्रदर्शनीही आयोजित केली जाणार आहे, असेही गादेवार यांनी सांगितले.

या अभियानात तालुका अध्यक्ष निखिल गादेवार यांच्यासह जिल्हा सचिव विजय नालावर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अशोकजी पुल्लूरवार, नगरपंचायत बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्ववार, तालुका माजी महामंत्री प्रसाद पुल्लूरवार, प्रसाद दासरवार, किशोर कांदो,व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या हिरीरीने सहभाग घेत आहेत