गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजू विद्यार्थी व नागरिकांना “साहित्य वाटप” कार्यक्रमाचे आयोजन
शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींना सायकली तर नागरिकांना स्मोकलेस चूला व स्प्रेपंप चे वाटप
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन, गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणुन आज दिनांक 01/10/2023 रोजी गडचिरोली पोलीस दल तसेच रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्ट व माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने दुर्गम भागातील गरजू नागरिकांसाठी विविध ‘साहित्य वाटप कार्यक्रम’ पोलीस मुख्यालय गडचिरोली येथील एकलव्य सभागृह येथे पार पडला.
यावेळी दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहीत बचत गटातील महिला व नागरिक उपस्थित होते. यामध्ये 75 विद्यार्थी-विद्यार्थींनींना सायकल, 75 नागरिकांना स्मोकलेस चूला तसेच पुरुष व महिला बचत गटांना स्प्रे-पंप व खताच्या बॅगेचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनी व नागरिकांना मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी गडचिरोली जिल्हयातील जनतेनी आपली आर्थिक प्रगती करावी व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन आपली उन्नती साधावी आणि गडचिरोली पोलीस दलाच्या विविध उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. यासोबतच महिलांना आता स्मोकलेस चूल्याच्या वापराने धुरामुळे होणारा त्रास कमी होईल. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट¬ा चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने जिल्हयाचा विकास साधावा व गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थींनींनी व बचत गटातील पुरुष व महिलांनी व इतर नागरिकांनी सायकल तसेच इतर विविध साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. तसेच रोटरी क्लब, साऊथ ईस्ट नागपूरचे अध्यक्ष श्री. राजीव वरभे, माऊली सेवा मित्र मंडळ, नागपूरचे अध्यक्ष श्री. सुहास खरे व रोटरी क्लब, नागपूर साऊथ ईस्टच्या फस्र्ट लेडी सौ. स्मिता वरभे मॅडम हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमकें व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी श्री. धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
।।।।।।।।।।।।
वार्तापत्र
दिनांक- 02/10/2023
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दुर्गम भागातील गरजू विद्यार्थी व नागरिकांना “साहित्य वाटप” कार्यक्रमाचे आयोजन
श्व् शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींना सायकली तर नागरिकांना स्मोकलेस चूला व स्प्रेपंप चे वाटप