Home Breaking News *एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक...

*एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत..!!*

106

*एटापल्ली येथील धावपटू तेजसला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत..!!*

 

*दानशूर राजेंनी पुन्हा एकदा गरजुला केली आर्थिक मदत..!!*

 

तालुका प्रतिनिधी अहेरी

 

अहेरी एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम गावचा रहवासी तेजस संगीडवार ह्या धावपटूने गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय १०० तथा २०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकून नाशिक येथे ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ३७ व्या राज्यस्तरीय अथेलेटिक्स स्पर्धेत पात्रता मिळविली आहे.

 

तेजसची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्याला मदतीची गरज असल्याची माहिती माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना मिळताच राजेंनी तेजसला अहेरी येथील रुक्मिणी महालात बोलावून घेत १००००/- दहा हजारांची आर्थिक मदत केली, तसेच तेजसला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राजेंनी शुभेच्छा दिल्या, ह्यापुढेही मदत लागल्यास आपण अवश्य मदत करू अशी ग्वाही ही दिली, ह्यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!