*चामोर्शी -मुल राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावे* *चामोर्शी येथील शिष्टमंडळाचे नितीन गडकरी यांना निवेदन*

139

*चामोर्शी -मुल राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करण्यात यावे*

*चामोर्शी येथील शिष्टमंडळाचे नितीन गडकरी यांना निवेदन*

चामोर्शी -(प्रकाश तुंबडे)चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याना जोडणारा चामोर्शी हरणंघाट मुल राज्य मार्ग क्र.३७० क हा मार्ग चंद्रपूर- गडचिरोली- राजनांदगाव महामार्ग क्रमांक ९३० आणि साकोली गडचिरोली सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ क यांना चामोर्शीला जोडतो.

चामोर्शी ते मुल हे २८ किलोमीटर अंतर हा राज्यमार्ग आहे . हा राज्यमार्ग अतिशय खराब झाल्यामुळे

या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून मार्गाची दुरस्त्ती करणे गरजेचे झाले आहे.

याच मार्गावरून सूरजागडवरून लोहखनिज वाहतूक करणारे हजारो ट्रक केलझर मालधक्कावर ये जा करीत असतात .

गोसीखुर्द धरणाच्या पुरामुळे हा मार्ग पावसाळ्यात तीन चार दिवस बंद राहतो.

चामोर्शी तालुका धान पिकासाठी प्रसिद्ध आहे व संपूर्ण तालुक्यात धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे धानाचा व्यापार सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो, धानावर आधारित राईस मिल मोठ्या प्रमाणात आहेत, परिसरातील धानाचे मोठे केंद्र चामोर्शी आहे त्यामुळे मुल चामोशी हरणघाट मार्गे मोठ्या प्रमाणात धानाची ने आण होते .

तसेच मुल, सिंदेवाही ,सावली , तळोधी ,(बाळापुर ) या ठिकाणी सुद्धा येथील धान्याची उलाढाल मोठया प्रमाणात केल्या जाते त्यामुळे मुल – चामोशी- हरणघाट मार्ग मजबूत होणे गरजेचे आहे.

तसेच चामोशी येथील लोकांचे रोटी बेटीचे संबध मूल , पोंभ्रूना तालुक्यातील लोकांशी आहे. त्यामूळे नागरिकांची नेहमी वरदळ या मार्गावर सुरू असते.

चंद्रपूर जिल्हा विभाजित होऊन गडचिरोली जिल्हा झाला असल्यामुळे येथील नागरिकांचे देवाणघेवाणीचे व्यवहार सतत चालू असतात. त्यामुळे मूल- हरणघाट- चामोशी रोडला अतिशय महत्त्व आहे.

तसेच मूल- हरणघाट- चामोशी मार्गावर विदर्भाची काशी असलेले मार्कंडा देवस्थान त्या देवस्थानात दरवर्षी होणारी महाशिवरात्रीची यात्रा बारमाही चालणारे अनेक धार्मिक विधी त्यामुळे पर्यटक सुद्धा नेहमी मार्कंड्याला मोठ्या प्रमाणात येत असतात म्हणून मूल चामोशी हरणघाट मार्ग मजबूत होणे गरजेचे आहे परंतु हा मार्ग अतिशय खराब असल्यामुळे चंद्रपूरला जाणाऱ्या रुग्णांना ,प्रवाशांना ,भाविकांना प्रवास अतिशय खडतर असा वाटू लागला आहे.

या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करून चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना उत्तम दळनवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी,अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी शिष्टमंडळामध्ये विजय कोमेरवार प्रदेश सदस्य शिक्षक आघाडी भाजपा,दीलीप चलाख जील्हा सचीव भाजपा,साईनाथ बुरांडे जील्हा सचीव भाजपा अमोल आईंचवार सामाजीक कार्यकर्ते,भोजराज भगत,प्रतीक राठी रामचंद्र वरवाडे उपस्थित होते.