गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलाने संयुक्त कार्यवाहीत एकुण 06 लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो अटकेत

60

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलाने संयुक्त कार्यवाहीत एकुण 06 लाख रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी मेस्सो गिल्लू कवडो अटकेत

 

जहाल माओवादी नामे मेस्सो गिल्लू कवडो वय 50 वर्षे, रा. रेखाभटाळ तह. एटापल्ली जि. गडचिरोली (एसीएम) माड सप्लाय टीम हा मौजा जाजावंडी – दोड्डुर जंगल परिसरात वास्तव्यास असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहि तीवरुन विशेष अभियान पथक, पोस्टे गट्टा (जां) पोलिस पार्टी व सिआरपीएफ 191 बटालियनच्या जवानांनी माओवाद विरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. त्यास सन 2023 साली मौजा हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली जि. गडचिरोली येथे दाखल अप. क्र. 0013/2023 कलम 307, 353, 143, 148, 149, 120 (ब) भादवी, 3/25, 5/27 भारतीय हत्यार कायदा, 3, 4 भारतीय स्फोटक कायदा, 135 महाराष्ट्र पोलीस कायदा व 13, 16, 18 (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आलेली आहे.

 

सदर जहाल माओवादी मेस्सो कवडो हा माओवाद्यांच्या सप्लाय टीममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तो नेहमी माओवाद्यांना विविध स्फोटक साहित्य, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करत असल्याने त्याची अटक गडचिरोली पोलीस दलासाठी महत्वाची ठरलेली आहे . तो दिनांक 14/10/2023 रोजी अटक झालेला जहाल माओवादी नामे डीव्हीसी चैतुराम ऊर्फ सुक्कू वत्ते कोरसा याच्या सोबत काम करत होता. या दोघांना चार दिवसांत अटक केल्याने माओवाद्यांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसला आहे.

 

#Naxalite #Arrest #GadchiroliNews