*ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक*  *18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनाची वेळ दुपारी 3 ऐवजी आता संध्याकाळी 5.30 पर्यंत*

137

*ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक*

*18 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशनाची वेळ दुपारी 3 ऐवजी आता संध्याकाळी 5.30 पर्यंत*

गडचिरोली,(जिमाका)दि.17: राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी कार्यक्रम देण्यात आलेला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीद्वारे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असून दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनपत्र सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून संगणकप्रणालीद्वारे नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र (affidavit) संगणकप्रणालीद्वारे भरले जात आहे. मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त होत आहेत. सदर तांत्रिक अडचण maha online कडून दूर करण्यात आली आहे. सबब दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी 11.00 ते दु.3.00 वा. पर्यंतची वेळ आता सायं. 5.30 पर्यंत वाढविण्यात येत असल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.

000000