उभ्या पिकांची नासधूस करणारे रानटी हत्ती उठले आता शेतकऱ्यांच्या जीवावर

87

उभ्या पिकांची नासधूस करणारे रानटी हत्ती उठले आता शेतकऱ्यांच्या जीवावर

 

दिभना येथील शेतकऱ्याच्या रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यु

परिसरात दहशतीचे वातावरण

गडचिरोली

आपल्या शेतात पिकांची नासधूस करत असलेल्या रानटी हत्तीच्या कळपाला पळवून लावण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा रानटी हत्तीच्या मृत्यु झाल्याची घटना दिनांक 17 ऑक्टोंबर रात्री नऊ वाजताच्या सुमारास दिभना शिवारात घडली

 

होमाजी गुरूनुले वय 55 वर्ष रा. दिभना ता.जि.गडचिरोली असे रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

 

17 ऑक्टोंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास रानटी हत्ती दिभना शेत शिवारात आल्याचे माहिती होताच होमाजी गुरूनुले व अन्य एक शेतकरी रानटी हत्तीला पळवून लावण्यासाठी गेले असता कळपातील एका हत्तीने होमाजी गुरूनुले याला सोंडेने उचलून खाली आपटले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका सहकारी हत्तींच्या तावडीतून सुटून आपला जीव कसाबसा वाचविला.या घटनेची माहिती होताच गडचिरोली पोलिस ठाण्याचे पथक व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा केला.