गडचिरोली ते गिलगाव बस सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिवसेनेने निवेदन देवून आगारप्रमुखाशी केली चर्चा

88

गडचिरोली ते गिलगाव बस सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिवसेनेने निवेदन देवून आगारप्रमुखाशी केली चर्चा

 

गडचिरोली येथुन १८ ते २० किमी धानोरा रोड वर असलेल्या मौजा- गिलगाव येथील सकाळच्या सुमारास एकही आवक-जावक बससेवा नसल्यामुळे, मौजा- गिलगाव व आसपासच्या परिसरातील स्थानिकांना दिवसेंदिवस अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, आणि येथुन,गडचिरोली शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थी ,युवतींना येण्याजाण्यासाठी अडथळा निर्माण होत असुन, या बाबतीत विद्यार्थीनी गडचिरोली एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांना वारंवार विनंती केली पण,काही उत्तर नाही. यावर गिलगाव येथील शिवसेना युवा कार्यकर्त्यांनी, सदर समस्या ही,श्री. अरविंदभाऊ कात्र्त्रटवार, गडचिरोली जिल्हा शिवसेना शाखा सहसंपर्कप्रमुख यांच्याशी चर्चा केली असता, ही समस्या कळताच,अरविंदभाऊ आपल्या शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व युवासेना कार्यकर्त्यांना घेऊन, गडचिरोली बसस्थानक येथील आगार व्यवस्थापकांकडे, ही समस्या अतिशय गंभीरपणे मांडत, गिलगावकऱ्यांची व तेथील विध्यार्थ्यींची अडचणी लवकरात लवकर दुर करण्यात याव्या, ही चर्चा करून निवेदन अर्ज देतांना.

श्री.अरविंदभाऊ कात्र्त्रटवार,विधानसभा सहसंपर्कप्रमुख गडचिरोली,सुरेंद्रभाऊ चंदेल,शिवसेनाप्रमुख कुरखेडा, श्रीमती.छायाताई कुंभारे, जिल्हा संघटिका महिला आघाडी गडचिरोली, आरती खोब्रागडे तालुका संघटिका महिला आघाडी गडचिरोली, गीताताई मेश्राम,महिला आघाडी गडचिरोली, व तसेच जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यात तत्पर मदतीला असणारे, श्री सुमेधभाऊ चांदेकर, युवासेना प्रमुख गडचिरोली तालुका प्रमुख उपस्थित होते.