प्रतिबंधित सु्गंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणा-या आरोपीस आरमोरी पोलीसांनी केली अटक
. सुगंधित तंबाखू मुद्देमाल व चारचाकी वाहन पोलीसांनी घेतले ताब्यात
. एकूण 09 लाख 30 हजार 990 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणायांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत. यावरुन दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी आरमोरी पोलीसांकडून सुगंधित तंबाखूची अवैधपणे साठवणूक करणाया आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 18/04/2026 रोजी पोलीस स्टेशन आरमोरी येथील पोलीस पथकाला गोपनिय बातमिदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे गोपाल निंबेकर रा. देऊळगाव, ता. आरमोरी, जि. गडचिरोली याने त्याच्या राहत्या घरी मोठ¬ा प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवला आहे. सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन आरमोरी येथील पोलीस पथकाने मौजा देऊळगाव येथील आरोपी नामे गोपाल निंबेकर याच्या राहत्या घरी पंचासमक्ष धाड टाकली असता, पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने आरोपी यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर पोलीस पथकाने आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घरात मोठ¬ा प्रमाणावर अवैध तंबाखुची साठवणूक केलेली असल्याचे आढळून आले. यासोबतच आरोपीच्या घराजवळ एक पांढया रंगाची चारचाकी मारुती व्हॅगेनार वाहन दिसून आली. त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये देखील अवैध तंबाखुचा साठा मिळून आला. सदर कारवाई दरम्यान खालीलप्रमाणे वर्णन असलेला एकूण मुद्देमाल मिळून आला, 1) हिरव्या, काळ्या, केशरी, शेंद्री रंगाचे होला हुक्का शिशा तंबाखू, ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेले एकूण 268 पॅकेट एकूण किंमत अंदाजे 2,96,900/- रुपये, 2) मजा 108 कंपनीचे 25 नग सिलबंद खड¬ाचे बॉक्स, मजा 108 हुक्का शिशा तंबाखु असे लिहीलेले 08 नग टिनाचे डब्बे, केसर युक्त विमल पान मसाला असे पिं्रट असलेले 50 नग सिलबंद पाऊच व इतर सुगंधित तंबाखू असे एकूण किंमत अंदाजे 97,790/- रुपये, 3) एक जुनी वापरती पांढया रंगाची (मारुती व्हॅगेनार) चारचाकी वाहन क्र. एम एच 33 एसी 6256 किंमत अंदाजे 5,00,000/- रुपये, 4) 01 नग जुना वापरता पोको कंपनीचा मोबाईल, 01 नग जुना वापरता मोटो कंपनीचा मोबाईल व इतर साहित्य एकूण किंमत अंदाजे 36,300/- रुपये असा एकूण 9,30,990/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरमोरी पोलीसांनी जप्त केला आहे. यावरुन आरोपी नामे गोपाल निंबेकर व घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचा मालक यशवंत विठ्ठल हर्षे, रा. गिलगाव, जि. गडचिरोली यांनी सदर अवैध तंबाखुचा मुद्देमाल अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे मिळून आले.
यावरुन सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. सुरेश तोर्रेम यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपी (1) गोपाल हरीराम निंबेकर, वय 39 वर्ष, रा. देऊळगाव, ता. आरमोरी जि. गडचिरोली (2) यशवंत विठ्ठल हर्षे, वय 40 वर्षे, रा. गिलगाव, ता. व जि. गडचिरोली यांचेविरुध्द अपराध क्रमांक 119/2026 कलम – 123, 223, 274, 275 भारतीय न्याय संहिता-2023 सहकलम – 59(त्), 26(2)(त्), 26(2)(त्ध्), 27(3)(ड्ढ), 3(1)(न्न्न्न्)(ध्) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपी नामे (1) गोपाल हरीराम निंबेकर व (2) यशवंत विठ्ठल हर्षे यांचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. विजय चलाक, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज. जी., सहा. पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आरमोरीचे पोलीस निरीक्षक श्री. कैलास गवते यांचे नेतृत्वात पोउपनि. सुरज अनपट, पोउपनि. विजय चलाख व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.






