Home Breaking News स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांची अवैद्यपणे जुगार खेळणा­या 22 आरोपींवर...

स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांची अवैद्यपणे जुगार खेळणा­या 22 आरोपींवर कारवाई

12

 

स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांची अवैद्यपणे जुगार खेळणा­या 22 आरोपींवर कारवाई

 

. घटनास्थळावरुन एकूण 71,85,330/- रुपयांच्या मूद्देमाल जप्त

गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत. यावरुन आज दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कुरखेडा पोलीसांकडून अवैध जुगार खेळणा­या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.

 

सविस्तर वृत्त असे आहे की, दिनांक 21/04/2026 रोजी रात्री 01/00 वाजताचे सुमारास एजाज शेख ऊर्फ कात्या रा. कुरखेडा हा खेडेगाव जंगल परिसरात बेकायदेशिररित्या काही इसमांना गोळा करुन ताश पत्त्यांच्या सहाय्याने अवैद्यपणे पेैसे लाऊन हार जितचा खेळ करीत आहे. अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना मिळाली होती. सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे सपोनी. भगतसिंग दुल्हत व पोलीस पथक असे गेवर्धा येथे पोहचून दोन स्थानिक पंचांसह जंगल परीसरात घटनास्थळी धाड टाकली असता, काही इसम हे बेकायदेशीररित्या 52 ताश पत्याच्या सहाय्याने पैशाची बाजी लाऊन जुगाराचा खेळ करताना दिसून आले. पोलीसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक व पोलीस स्टेशन कुरखेडा येथील पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणारे आरोपी, जुगार साहीत्य तसेच रोख रक्कम ताब्यात घेतले आहेे. घटनास्थळावरुन एजाज रफीक शेख ऊर्फ कात्या, वय 41 वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. कुरखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याच्यासह एकूण 22 आरोपींवर कायदेशीर कारवाई करुन ताब्यात घेतले आहे.

 

यावेळी आरोपींच्या अंगझडती दरम्यान घटनास्थळावरुन 2,75,200/- रुपये रोख रक्कम तसेच जुगार खेळण्याचे पत्ते, 23 नग जुने वापरते मोबाईल, 13 चार चाकी वाहने, 06 दुचाकी वाहने असा एकूण 71,85,330/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह वर नमूद आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले. नमूद आरोपीतांविरुध्द पोस्टे कुरखेडा येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करुन गुन्ह्राचा पुढील तपास पोनि. महेंद्र वाघ, पोलीस स्टेशन कुरखेडा हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, पोस्टे कुरखेडाचे पोनि. महेंद्र वाघ, स्थागुशाचे सपोनि. भगतसिंग दुल्हत, पोहवा/सुधाकर दंडीकेवार, पोअं/राजू पंचफुलीवार, श्रीकांत बोईना, निशीकांत अलोणे, भास्कर आघाव, राजकुमार खोब्राागडे, दिपक लोणारे तसेच पोस्टे कुरखेडाचे पोहवा/शेखलाल मडावी, पोना/अमोल आलाम, पोशि/संदेश भैसारे, नंदकिशोर मेश्राम, नरसिंह कोरे यांनी केलेली आहे.

Don`t copy text!