जयरामपुर – कोनसरी मार्गावर आष्टी पोलिसांनी पकडली लाखो रुपयांची अवैध दारू

83

जयरामपुर – कोनसरी मार्गावर आष्टी पोलिसांनी पकडली लाखो रुपयांची अवैध दारू

 

आरोपी वाहन सोडून पसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

 

छत्तीसगड व तेलंगणा राज्यात होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रिया च्या अनुषंगाने चोराटी होणारी दारू वाहतुक याची माहिती काढून कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक निलोत्पल सर यांनी आदेक्षित केले असून त्या अनुषंगाने 22/10/2023 रोजी च्या रात्रौ दरम्यान गोपनीय माहितीद्वारे माहिती प्राप्त झाली की एका चार चाकी वहाण क्रमांक MH 34 AM – 8075 या मधून विधानसभा निवडणुक होत असलेल्या छत्तीसगड राज्यात घाटकुल पूल ते कोणसरी मार्गे चोराटी दारू वाहतुक होणार आहे अशी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने कारवाई पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी जयरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी केली परन्तु वाहण चालक याने वाहण नाकाबंदी च्या ठिकाणा पासून काही अंतरावर थांबहून वाहण सोडून पळून गेला. त्या नंतर नमूद वाहनास पंचासमक्ष चेक केले असता त्यामध्ये देशी दारू १,७६,६०० /- रूपयांची व एक वाहन अंदाजे ६ लाख रुपये किम्मत असा एकूण ७,७६,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. नमूद अज्ञात चालक याचे विरुद्ध गुन्हा क्रमांक २६२/२०२३ कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.

आष्टी पोलीस ठाणे यांनी एक दिवसा पूर्वीच एक अवैध दारू वाहतुक वरती धडक कारवाई केली होती. त्या मध्ये देशी विदेशी दारू चा 1,25,600/- व एक वाहन अंदाजे 4 लाख रुपये किंमत असा एकूण 5,25,600/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. अशी दोन दिवसात एकूण 3, 02,200/- रूपयांची दारू व 10 लाख रुपये किमतीचे दोन चार चाकी वाहणे असा एकूण 13,02,200/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे अवैध दारू वाहतुक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कामगिरी ही . पोलिस अधीक्षक निलोत्पल , अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) चिंता , अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी विभाग) यतीश देशमुख सर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे, सोमनाथ पवार, पो. हवा. वाकुडकर, करमे, पो. शि. गगन गोडबोले, पो. शि. प्रशांत चुधरी, अतुल तोडासे, संतोष नागुलवार, यांनी पार पाडली.