*गानली समाजाची कोजागिरी, ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.*

162

*गानली समाजाची कोजागिरी, ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन.*

गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ गडचिरोलीचे वतीने, कोजागिरी, ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम, गानली समाज सभागृह, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला.

कोजागिरी कार्यक्रमात विजया पोरेड्डीवार, अशोक चन्नावार ,प्रकाश तोडेवार, कविता पोरेड्डीवार, स्नेहल संतोषवार, गीता हिंगे, मनिष रक्षमवार यांचा त्यांच्या मौलिक व सामाजिक कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

कविता पोरेड्डीवार यांनी आपल्या वक्तव्यातून असे सुचविले की, पाच – दहा वर्षानंतर आपण आपल्या पुढील पिढीपासून रोजगाराच्या समस्येमुळे दुरावत जाऊन एकाकी पडणार आहोत. या समस्येचा सामना करण्यासाठी मंडळांनी विरंगुळा म्हणून किमान सदनिका तयार करायला हव्यात असे प्रतिपादन केले. गीता हिंगे यांनी आधार विश्व फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात जनसामान्यांना मदत म्हणून कित्येक कोरोनाग्रस्त परिवाराच्या जेवणाची व्यवस्था केली होती. समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मंडळाने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी असे मत व्यक्त केले. पत्रकार मनीष रक्षमवार यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याची वाखाणनी केली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मंडळाचे माजी अध्यक्ष अशोक चन्नावार यांनी आपण अथक परिश्रमाने मंडळाचे मंगल कार्यालयाची वास्तू उभारली व यानंतर समाजातील कमकुवत गटातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा आपला मानस असल्याचे मत व्यक्त केले. मंडळाचे सचिव रवींद्र आयतुलवार यांनी मंडळातर्फे, आरोग्य शिबिर, गुणवंत विद्यार्थी सत्कार, ज्येष्ठ नागरिक व गरीब कुटुंबांना सानुग्रह अनुदान यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.

क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक प्राप्त करून समाजाचे नाव उज्वल करणारे, शेजल किशोर गद्देवार, ओवी अमोल गद्देवार व अद्वित निकेतन गद्देवार या विद्यार्थ्यांना मंडळातर्फे चषक व गौरव प्रमाणपत्राद्वारे सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

समाजातील ज्येष्ठ नागरिक सुमन येनप्रेड्डीवार, कुसुम आयतुलवार, वच्छला वडेट्टीवार, सुमन संतोषवार, मनोहर वरगंटीवार, प्रभाकर गांगरेड्डीवार, विलास संतोषवार यांचा सुद्धा मंडळातर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला उपस्थितांच्या मनोरंजनासाठी बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम व समाजातील होतकरू महिलांचा गरबा नृत्याचे आयोजन मंडळाच्या सदस्या ममता कोतपल्लीवार व सुरेखा चन्नावार यांनी केलेले होते. कार्यक्रमाचे संचलन मंडळाचे सहसचिव नितीन संगीडवार यांनी तर पाहुण्यांचे आभार सचिव रविंद्र आयतुलवार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष रवी चन्नावार, सदस्य भास्कर वडेट्टीवार, निकेतन गद्देवार, संजय पोरेड्डीवार, नरेंद्र चन्नावार, विरेंद्र वडेट्टीवार, बंडू वडेट्टीवार, मनोज बोमनवार, प्रमोद वरगंटीवार, नंदू गुंडावार, मंगेश कोतपल्लीवार, राकेश रत्नावार यांनी विशेष सहकार्य केले.