*केंद्र व राज्य सरकाच्या योजना काढण्यास जनतेला सहकार्य करा* :- 

219

*केंद्र व राज्य सरकाच्या योजना काढण्यास जनतेला सहकार्य करा* :-

_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे बूथ पालकांना आवाहन_

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्र बूथ पालक मेळावा चामोर्शी येथे संपन्न.*

 

गडचिरोली :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राची बूथ पालक बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार देवरावजी होळी, बुथ पालक जिल्हा प्रमुख मार्गदर्शक वीरेंद्रजी अंजनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

 

बैठकीला किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,जिल्हा सचिव रंजिताताई कोडपे,ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री भास्कर बुरे,जिल्हा सचिव विलासजी दशमुखे,दिलीपजी चलाख, चामोर्शी शहरध्यक्ष सोपानजी नैताम,तालुका अध्यक्ष आनंदजी भांडेकर, गडचिरोली शहरध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, तालुका अध्यक्ष विलासजी भांडेकर,धानोरा तालुकाध्यक्षा लताताई पुंघाटी,मनिकजी कोहळे,दीपकजी हलदर, मारोतीजी इंचोडकर, प्रवीणजी दरेकर व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे बूथ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक घरी गॅस, विज, शौचालय अशा योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळवुन दिला. त्यातच शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी उपयोगी सिंचनाची सोय, खते, बी-बियाणे अशा शेतीसाठी लागणाऱ्या घटकांची सोय करुन दिली.

 

पिएम किसान,आयुष्यमान भारत, विश्वकर्मा योजना, बंचित घटकांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा अशा अनेकानेक योजना मोदी यांनी राबविल्यात मोदी यांच्या सर्व योजनांची माहीती गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्य माणसाला पटवुन सांगा राज्य सरकारनी मोदी

 

कृषी किसान योजना, आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाखापर्यंत मोफत उपचार, शिष्यवृत्ती, ओबीसींसाठी वस्तीगृह, दिन दलीत, गोर-गरिब मुलांसाठी परदेशी शिक्षणासाठी उत्तम सोय, गोरगरिब लोकांना आनंदाचा शिधा व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कामगारांना एक लाख पर्यंत कर्ज अशा योजना प्रत्येक व्यक्तीं पर्यंत पोहचवा व येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी व मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी कामाला लागा.

प्रत्येक बुथवर जाऊन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, आयुष्यमान भारत व आभा कार्ड तसेच निराधार पेन्शन योजना, नमो घरकुल योजना काढण्यास जनतेला सहकार्य करा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी बूथ पालकांना केले.