*बलशक्ती व धनशक्ती पेक्षा संघटनशक्ती हीच खरी शक्ती – डॉ. नामदेव किरसान.*
मौजा पळसगांव ता. आरमोरी जि. गडचिरोली येथे आदिवासी गोंड समाज व गावकरी मंडळी पळसगांव च्या वतीने बिरसा मुंडा जयंती व सल्ला सक्ती पूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर ठिकाणी मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान. यावेळी माजी आमदार आनंदरावजी गेडाम, रामदासजी मसराम, दिलीपभाऊ गोडाम, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, संदीप ठाकूर, सरपंच जयश्रीताई दडमल, पोलीस पाटील गीताताई घोडाम, दुर्वास नाईक, रामजी मानकर, मोहनजी मडावी, बाजीराव सयाम, शेषरावजी कुमरे, सोनूताई गरबडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



