*सद्भावना-स्नेह हा अधिका-अधिक वृद्धिंगत होणे हि काळाची नितांत गरज:- इंजि.प्रमोदजी पिपरे*
*मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस यांच्या वतीने लक्ष्मीपूजन व स्नेहमिलन सोहळा संपन्न*
*गडचिरोली:-दि.१८ नोव्हेंबर*
*दीपावली निमित्त मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चंद्रपूर रोड गडचिरोली येथे कार्तिक शुद्ध ५ (पंचमी)निमित्त लक्ष्मीपूजन व स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक परिवारात सुसंवाद घडावा, त्यासाठी सर्वांनी अधून मधून प्रत्यक्ष एकत्र येऊन संवाद करावा व आपुलकीची नाळ जोडून राहावी यासाठी मित्रपरिवार,नातीगोती यांच्यामध्ये सद्भावना-स्नेह अधिका-अधिक वृद्धिंगत होणे हि काळाची नितांत गरज आहे.असे प्रतिपादन मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे सर्वेसेवा तथा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी यावेळी केले.*
*स्नेहमिलन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रातील मित्रपरिवार उपस्थित राहून पिपरे परिवार यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आचार-विचारांची देवाण-घेवाण केली.*
*याप्रसंगी मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे सर्वेसेवा तथा लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे,भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे, मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेस चे संचालक अनुराग प्रमोदजी पिपरे,संचालिका कु.दर्शिता प्रमोदजी पिपरे,मे.पिपरे पेट्रोलियम सर्व्हिसेसचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.*
*स्नेहमीलन सोहळा कार्यक्रमाला आमदार डॉ. देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,डॉ. यशवंतजी दुर्गे,शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे,शहर उपाध्यक्ष विवेकजी बैस,अनिल पोहनकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.*



