*आरक्षणावर बोलण्याआधी शासनाने सर्वप्रथम जातीय जनगणना करावी – डॉ. नामदेव किरसान.* 

83

*आरक्षणावर बोलण्याआधी शासनाने सर्वप्रथम जातीय जनगणना करावी – डॉ. नामदेव किरसान.*

दिनांक 20 नोव्हेंबर 2023 रोजी मोजा मेहा ता. सावली जि. चंद्रपूर येथे नाट्यप्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली=चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेव किरसान* यांनी केंद्र सरकार जनगणना करीत नसल्याबद्दल खेद व्यक्त करतानांच ओबीसींची सुद्धा जात निहाय जनगणना झाली पाहिजे, त्याशिवाय खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. योग्य प्रतिनिधित्वासाठी याची आवश्यकता आहे. तसेच आरक्षणावर लादलेली 50% ची मर्यादा संसदेत कायदा करून हटविल्याशिवाय समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व देता येणार नाही. ही मर्यादा न हटविताच राज्य सरकार मराठ्यांना तसेच धनगरांना सुद्धा आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहे जे चुकीचे आहे. हा जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार असून शासनाद्वारे तरी असे करणे घातक आहे. करिता शासनाने जाती-जाती तेल निर्माण करण्याचे काम करू नये असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी बांधकाम सभापती दिनेशजी चिटनूरवार, राजूभाऊ सिद्धम, सरपंच रुपेश रामटेके, गडचिरोली काँग्रेस अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन विभाग जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गडचिरोली तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसंत राऊत, सह गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने नाट्य रसिक श्रोते उपस्थित होते.