*राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत-तुकडोजी महाराज–:- सौ.योगीताताई पिपरे*

125

*राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत-तुकडोजी महाराज–:- सौ.योगीताताई पिपरे*

 

*अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवमंडळ शाखा रामनगर च्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतीथी निमित्त पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम*

 

*गडचिरोली–दि.२५ नोव्हेंबर २०२३*

 

*संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह,आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले.अंधश्रद्धा निर्मुलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले.आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.म्हणुन ते राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत आहेत.असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांनी केले.*

*अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्त २१नोव्हेंबर२०२३ ते २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आज २५ नोव्हेंबर रोजी महिला संमेलन व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी उद्घाटक म्हणुन तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सौ.योगीताताई पिपरे बोलत होत्या.*

*याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा भाजपा जेष्ट नेत्या प्रतिभाताई चौधरी, कार्यक्रमाच्या संयोजिका कविताताई उरकुडे, सहसंयोजिका वर्षाताई शेडमाके, छायाताई श्रीपदवार,रंजना भुरसे, मंदाताई मांडवगडे,विध्या विश्रोजवार,लता आकनुरवार,विध्या फुलबांधे,अंजु मांडवगडे,नीता कतलपवार,मनीषा उरकुडे,प्रेमीला शेडमाके, अल्का देशमुख, सुनीता मडावी,मंगला कोवे,सुभद्रा गेडाम,अंजना वाढई,कलिता उरकुडे,भावना निलेकार व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते*