Home चंद्रपूर 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

153

15 फेब्रुवारीपासून महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत जिल्हाधिकारी यांचे आदेश

चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी : राज्यात टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रतिबंधीत क्षेत्र वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांतर्गत येत असलेले विद्यापीठ व महाविद्यालयाचे वर्ग, वसतीगृह दिनांक 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यास काल एका आदेशान्वये परवानगी दिली आहे.

यानुसार सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वसंअर्थसहाय्यीत विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमीत वर्ग सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजीचे परिपत्रकातील मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक राहणार आहे.

आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांचेवर साथरोग कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारती दंड संहिता यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

Don`t copy text!