हिवाळी अधिवेशनात अनेक ज्वलंत प्रश्न मांडणार
आमदार डॉ. देवराव होळी पत्रकार परिषदेतून माहिती
येत्या ७ डिसेंबरला विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे त्यात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी आपल्या विधानसभा क्षेत्रातील अनेक ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडणार असून विविध प्रश्नांना उजाळा देणार आहेत अशी माहिती आज गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील स्थानिक विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा महिला अध्यक्ष गीता हिंगे, माजी पंचायत समिती सभापती विलास देशमुख, मारोती इचोळकर, भाजपा शहर महिला आघाडी कविता उरकुडे, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, हेमंत बोरकुटे महामंत्री हे हजर होते.
गडचिरोली शहरातील नगर परिषदेची प्रशासकीय भवन अजूनही अपूर्ण असून ५ कोटी मंजूर करून प्रशासकीय भवन उभे करणार असल्याची माहिती दिली.गडचिरोली शहरात १०० कोटीच्या पाणीपुरवठा प्रस्तावाला मान्यता मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न असेल, गडचिरोली शहरातील गटार लाईनचे जवळपास ९०% काम पूर्ण झालेले असून उर्वरित दहा टक्के काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
सन २०२४-२०२५ या वर्षात गडचिरोली येथील मेडिकल कॉलेजची नवीन बॅच सुरू करण्याचा पुरेपूर प्रयत्न असणार आहे. तसेच जिल्हा स्टेडियमचे संत गतीने सुरू असलेले काम तात्काळ निकाली लावण्याचा प्रयत्न असेल.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नाट्यगृह सुमारे ५ एकर परिसरात पन्नास ते शंभर कोटीचा उभारणार.गडचिरोली जिल्ह्यात आपल्या विधानसभा क्षेत्रात वाघ, हत्ती च्या हल्ल्यात मृतक पावलेल्यांना वर्ग तीन व चार च्या नोकरीमध्ये समाविष्ट करावा अशी सुद्धा त्यांची मागणी असणार आहे.
मार्कंडा देवस्थानचे रखडलेला काम पूर्ण होण्यासाठी आणि रेगडी येथील कन्नमवार जलाशयाच्या दुरुस्तीसाठी निधी, उपसा सिंचन प्रकल्प, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व समाजातील व्यक्तींच्या २०११ पूर्वीच्या अतिक्रमण वन जमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी मागणी व प्रयत्न करणार यासह आपल्या विधानसभा क्षेत्रातील अनेक ज्वलंत प्रश्न विधान मंडळाच्या पटलावर मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली.




