महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगर पंचायत चामोर्शी येथील दुकानावर व आस्थापणावर मराठी भाषेतील पाट्या लावण्याबाबत निवेदन देण्यात आले… ✓सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 25/11/2023 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये दुकान व आस्थापणावर मराठी पाट्या लावणे बंधनकारक असताना सुद्धा चामोर्शी शहरात अनेक दुकानावर व आस्थापनावर ठडक मराठी भाषेत पाट्या लागलेले नाही हे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान व मराठी भाषेचा अवमान आहे…त्या अनुषंगाने जर येत्या 3-4 दिवसा मध्ये नगर पंचायत चामोर्शी तर्फे अश्या दुकानदारांवर कोणती कडक कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जनआंदोलन उभे करू असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले….यावेळी चंद्रकांत पिपरे (चामोर्शी तालुका अध्यक्ष),अंकुश संतोषवार,शुभम भांडेकर(तालुका उपाध्यक्ष), शुभम भांडेकर(शहर अध्यक्ष),आकाश नेवारे(शहर उपाध्यक्ष),अभिषेक कोत्तावार(तालुका संघटक),सारंग भांडेकर(मनविसे तालुका अध्यक्ष),संतोष राजकोंडावर व ईतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते…
Home Breaking News महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगर पंचायत चामोर्शी येथील दुकानावर व आस्थापणावर मराठी भाषेतील...




