डॉ वामन गवई यांचे उद्या व्याख्यान
अहेरी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीसाठी रुपयाची समस्या या विषयावर ऑक्टोबर 1922 ला प्रबंध सादर केला.
रुपयाची समस्या हा प्रबंध डिसेंबर 1923 ला पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाला. या ग्रंथावरच रिझर्व बँक ऑफ इंडिया चा डोलारा उभा आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रुपयाची समस्या या प्रबंधाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. इतिहासातील या महत्वपूर्ण घडामोडी स शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने एम्प्लॉईज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट या संघटनेकडून भारतीय समाज व्यवस्थेत डॉक्टर बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय योगदान या विषयावर उद्या एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
आयोजित चर्चासत्राला प्रमुख वक्ते कडून डॉक्टर वामन गवई डॉक्टर आंबेडकर विचारधारा विभाग संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती हे लाभणार असून आयोजित चर्चासत्राला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आयोजित चर्चासत्राला उद्घाटक म्हणून जि प गडचिरोलीच्या माजी अध्यक्ष सौ भाग्यश्री हलगेकर आत्राम राहणार आहेत. अध्यक्षस्थानी पोलीस स्टेशन आहेरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे आहेत. प्रमुख उपस्थिती गोंडवाना विद्यापीठाचे मूल्यमापन व परीक्षा नियंत्रण विभागाचे नियंत्रक दिनेश नरोटे, साप्ताहिक लोकसेवा वज्रपथ अमरावतीचे संपादक बाबाराव गायकवाड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ईश्वर ढोके, प्राचार्य खुशाल बांगरे, एकनाथ चांदेकर यांची राहणार आहे.
आयोजित कार्यक्रमाचे आयोजन भगवंतराव शिक्षण महाविद्यालय अहेरी येथे सकाळी 10 वाजता करण्यात आलेले आहेत.
आयोजित चर्चासत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अर्थशास्त्रीय लिखाण, संशोधन आणि भारताच्या विद्यमान अर्थशास्त्रीय व्यवस्थेत त्यांचे योगदान यावर व्यापक चर्चा होणार असल्याने जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे




