*बूथ निहाय बैठकीचे आयोजन करून केंद्र सरकारच्या 9 वर्षाचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवा*
_भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचे आवाहन_
——————————————
*प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली आरमोरी तालुका संघटनात्मक बैठक संपन्न*
दिनांक :- 13 डिसेंबर 2023
आरमोरी :- आरमोरी तालुका संघटनात्मक बैठक जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली व लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्रामगृह आरमोरी येथे पार पडली.
यावेळी बैठकीला सदानंद कुथे, जिल्हा महामंत्री, नंदुजी पेट्टेवार जिल्हा सचिव, भारत बावनथडे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री, पंकज खरवडे तालुका अध्यक्ष, पवनजी नारनवरे नगराध्यक्ष,विलास पारधी शहराध्यक्ष, गोविंदा भोयर युवा मोर्चा अध्यक्ष, श्रीहरीजी कोपुलवार,नीता ढोरे महिला अध्यक्ष, मीनाक्षीताई गेडाम, चांदेवारताई, मनेताई, शेलोकरताई मनोजजी मने, भास्कर बोडणे जितू ठाकरे, अक्षय हेमके, प्रसाद साळवे, ईश्वरजी पासेवार सभापती ओंकार मडावी,मनोज पांचलवार, अमोल खेडकर तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते की, येणारा नववर्ष हा निवडणुकीचा असल्यामुळे आगामी निवडणुका केव्हाही लागू शकतात त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी, बूथ पालकांनी, बूथ प्रमुखांनी तालुक्यातील सर्व बुथांवर बूथनिहाय बैठकीचे आयोजन करून जनसामान्यासाठी केंद्र सरकारने चालू केलेल्या योजनांची माहिती देऊन त्यांना योजनेचा लाभ घेण्यास सहकार्य करावे.
असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.




