Home Breaking News एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह...

एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह सापडले

104

आज रोजी पोस्टे गोडलावही पासून १० किमी अंतरावर छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील बोधीटोला जवळ माओवाद्याची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या आणि निष्पाप आदिवासीना मारण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची गोपनीय सूत्रांकडून खात्रीशीर माहिती मिळाली

यावरून सदर परिसरात पोलीस दलाकडून तातडीने शोधमोहीम राबवली गेली. पोलीस दल परिसरात शोध घेत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला ज्याला पोलीस दलाने प्रत्युत्तर दिले. जवळपास एक तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर परिसरात झडती घेतली त्यावेळी एक AK47 आणि एक SLR शस्त्र सह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख म्हणजे कसनसूर दलमचा उप कमांडर दुर्गेश वट्टी, जो 2019 मध्ये जांभूळखेडा स्फोटाचा मुख्य सूत्रधार होता ज्यात गडचिरोली पोलिसांचे 15 पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. पुढील ऑपरेशन्स आणि परिसराचा शोध सुरू आहे.

Don`t copy text!