*लोक बिरादरी प्रकल्प,हेमलकसा च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

71

*लोक बिरादरी प्रकल्प,हेमलकसा च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

 

*जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले अभिनंदन*

 

*◆भामरागड◆* : *तालुक्यातील हेमलकसा येथे 23 डिसेंबर 1973 रोजी जगप्रसिद्ध समाजसेवक मा. बाबा आमटे यांनी माडिया व गोंड समाज यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरु केले. ते कार्य अविरत पणे पुढे जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांनी सेवा करत त्या सेवे चे 23 डिसेंबर 2023 रोजी 50 वर्ष पूर्ण केले त्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिन च्या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून जेष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे यांची शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांच्या निरोगी आरोग्य तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले*

*या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला डॉ विकास आमटे,डॉ दिगंत आमटे,प्रसिद्ध समाजसेवक अनिकेत आमटे यांच्या सह अनेक डॉक्टर, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते*