*खेळांमुळे शाररिक विकासा सोबत मानसिक आरोग्य तितकेच महत्वाचे* – ऍड. विश्वजीत कोवासे सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस,
दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी मौजा कन्हाळगाव येथे जननायक धरती आबा भगवान बिरसा मुंडा कबड्डी क्लब च्या वतीने आयोजित बक्षिस वितरण समारंभाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव, ऍड. विश्वजीत कोवासे यांच्या उपस्थित पार पडले.
यावेळी आपल्या भाषणात ऍड. विश्वजीत कोवासे यांनी खेळांमुळे खेळाडू वृत्ती जागृत होऊन मानसिक दृष्ट्या प्रघल्भ होते. परंतु सध्याच्या सरकारच्या धोरणामुळे युवकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात महागाई, बेरोजगारी, बेकारी पसरत चालली आहे. कंत्राटीकरण व खासगीकरणामुळे युवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षण असून सुद्धा रोजगार मिळत नाही, विद्यमान सरकार खेळळुंना सोयीसुविधा पुरावून होतकरू खेळाडूंना प्रोत्साहण देण्याऐवजी खेळाची मैदानं व स्टेडियम खाजगी लोकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या खाजगीकरणामुळे गरीब खेळाडूंना खेळाच्या योग्य सोयीपासून वंचित ठेवण्याचे काम सरकार करीत आहे. सार्वजनिक उपक्रमाच्या खाजगीकरणाचा सपाटा या सरकारने चालविलेला असल्यामुळे व शासकीय कार्यालयातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकऱ्या संपुष्टात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. या सगळ्या घळामोळी ची जाणीव ठेवून युवकांनी सरकार निवडतांना या बाबी विचारात घेणे गरजेचे आहे.नवीन पात्र युवकांची नोंदणी मतदार यादीत करून मतदानाचा अधिकार बजवावा व योग्य सरकारची निवड करावी असे आव्हान विश्वजित भाऊ कोवासेंनी केले.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित नीलकंठ जी निखाडे साहेब सरपंच सोमानपल्ली, निकेशजी गद्देवार माजी जी.प. सदस्य, राजुभाऊ आत्राम माजी जी. प. सदस्य, विश्वास जी बोमकंनठीवार, मा माडे सर, बाबुराव जी कुमरे, वसंत कुमरे, बंडू मरसकोल्हे, रामदासजी ईश्ठाम,उरकुडा जी मडावी, आणि सर्व गणमान्य मंडळी व प्रेक्षक उपस्थित होते.




