पोस्टे देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

102

पोस्टे देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट

 

गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल सा. यांचे आदेशान्वये पोस्टे देसाईगंज हद्दीतील अप्रैध दारू विक्रो करणायावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोस्टे देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील एकूण किमत १६,००,०००/- रुपयाचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल काल दिनांक २७/१२/२०२३ रोजी नष्ट करण्यात आला.

 

सविस्तर वृत्त पाप्रमाणे आहे की, मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडचिरोली यांचे परवानगीने काल दिनांक २७/१२/२०१३ रोजी पोस्टे देसाईगंज बेधील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. किरण रासकर यांनी राज्य उत्पादक शुल्क, गढ़चिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक श्री. चं. पि. भगत पांच्यासह पोस्टे देसाईगंज हद्दीतील विविध दारुबंदी गुन्ह्यातील जप्त मुरोमाल नष्ट करण्यात आला. ज्यामध्ये १) देशी दारुच्या ९० मिली मापाच्या ३६९५० बाटल्या, २) देशी दारुच्या १८० मिली मापाच्या ३१७ बाटल्या, ३) विदेशी दारुच्या १८० मिली मापाच्या ६८० बाटल्या, ४) ७५० मिली मापाच्या विदेशी दारुच्या १७ बाटल्या, ५) ५०० मिली वियरच्या ३० टिनाचे कैन असे एकुण ३७,९९४ बाराचे मुद्देमाल जेसीबिच्या सहाय्याने १० X १० चा खोल खड्डा खोदून रोड रोलरच्या सहाय्याने कड़क व मुरमाड जागेवरती मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लॉस्टीकच्या बाटलांचा चुरा करण्यात आला व काचेचा पुरा व प्लॅस्टीकच्या चेपलेल्या बाटल्या जेसीचीच्या फावडपांच्या सहाय्याने खड्यात टाकण्यात आला. तसेच खड्डा पुर्ववत बृजर्जावण्यात आला. सदर मुद्देमालाची विल्हेवाट लावतांना पर्यावरणाची हानी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेण्यात आली,

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख

 

सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी फुरखेडा श्री. साहील झरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंज येथील प्रभारी अधिकारी श्री. किरण रासकर व सर्व अंमलदार तसेच राज्य उत्पादन शुल्क विभगाचे सहकारी स्टॉफ यांचे उपस्थीतीत पार पडली.