शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलीस कॅडेट निवासी शिबिराचा समारोप ,पोलीस अधीक्षक सा. गडचिरोली यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा सपन्न

71

 

शिस्तबध्द पथसंचलनाने स्टुडंट पोलीस कॅडेट निवासी शिबिराचा समारोप ,पोलीस अधीक्षक सा. गडचिरोली यांचे हस्ते बक्षीस वितरण सोहळा सपन्न

जिल्हा परीषद शाळा धानोराच्या विद्याथ्र्यांनी पटकविला प्रथम क्रमांक

 

राष्ट्रीय पोलीस मिशन अंतर्गत गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारा सन 2018 पासुन राष्ट्रीय स्तरावर “स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम” राबविला जात असल्याने या उपक्रमांतर्गत इयत्ता 08 वी व 09 वी मधील विद्याथ्र्यांकरीता आंतरवर्ग, बाह्रवर्ग आणि क्षेत्रीय भेटी आयोजीत करुन विद्याथ्र्यांना व्यक्तीमत्व व नितीमत्ता विकासाला उपयुक्त असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव मिळत असून त्यांच्यात सामाजिक जाणीवा प्रगल्भ होऊन व्यक्तीगत हिताईतकेच सामाजिक जबाबदारीचे भान वाढीस लागत आहेत. तसेच या उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यांना नितीमुल्यांचे महत्व शिकविले जात असून समाजातील भ्रष्टाचार आणि वाईट चालीरितींचा मुकाबला करण्यासाठी तयार केले जात आहे. यासोबतच विद्याथ्र्यांमध्ये संयम, सहनशिलता, शिस्त व सकारात्मक दृष्टीकोन, नैतिक प्रामाणिकपणा इ. मुल्यांची जडणघडण होण्यासाठी व त्याच्या सर्वांगीण विकासात भर पडावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे दिनांक 26/12/2023 ते 30/12/2023 पर्यंत एनसीसीचे धर्तीवर महाराष्ट्रात प्रथमत:च पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमांतर्गत पाच दिवसीय “निवासी प्रशिक्षण शिबीराचे” आयोजन करण्यात आले आहे.

 

सदर पाच दिवसीय आयोजीत शिबीरामधील आज शेवटचा दिवस असुन या संपुर्ण शिबिरामध्ये विद्यांथ्र्यांनंा कॅम्प करीता लागना­या साहित्याचे वाटप करुन त्यांच्या निवासस्थान व जेवनाची सोय करण्यात आली. तसेच विद्याथ्र्यांना स्टुडंट पोलीस कॅडेट प्रोग्राम, ई सुरक्षा व सायबर सुरक्षा, मुल्ये आणि नितीशास्त्र, महिला आणि मुलींची सुरक्षा, समाजातील वाईट गोष्टीविरुध्द लढा, नितीतत्वे, संयम, सहनशीलता, संवेदना, सहानुभुती, वडीलधा­यांचा आदर, शिस्त संघभावना, दृष्टीकोन, महाराष्ट्र पोलीस, गुन्हे प्रतिबंध व उपाययोजना, भ्रष्टाचार विरोधी लढा, कम्युनिटी पोलीसींग, सुरक्षा व रहदारी जागरुकता व नक्षलवाद विरोधात विद्याथ्र्यांची भुमीका या विषयावर तज्ञ मान्यवरांकडुन मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबत पोलीस विभागातील अत्याधुनिक हत्यांराबाबत शस्त्र प्रदर्शनाद्वारे माहिती देण्यात आली, तसेच पुर परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन व निवारण दल कशा पद्धतीने लोकांना मदत करतात याचे प्रात्यक्षिक, अग्निशामक दल हे एखादया ठिकाणी आग लागल्यानंतर कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवुन आगीत अडकलेल्या लोकांची मदत करतात याबाबत प्रात्यक्षिक तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने श्वानपथकाने प्रात्यक्षिकाव्दारे बॉम्ब शोध व गुन्ह्राच्या तपासात श्वानाचे काय महत्व आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात बघतांना विद्याथ्र्यांनी आनंद घेतला. यासोबतच ट्रॅकींग, योगा, शारिरीक कवायत कार्यक्रम, पथसंचलन, कबड्डी, व्हॉलीबॉल, 100 मी धावने, 400 मी. 4 न् 100 रीले, वक्तृत्व, गायन, समुह नृत्य, वाद-विवाद व समाजातील दुष्ट चालीरीती या विषयांवर पथनाट¬, असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, टेन्ट सुशोभिकरण स्पर्धा घेण्यात आले

आज दि. 30/12/2023 रोजी निवासी प्रशिक्षण शिबीराचे समारोप प्रसंगी स्टुडंट पोलीस कॅडेट यांचे शिस्तबध्द पथसंचलनाचे निरीक्षण मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी केले. त्यानंतर पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांनी करुन विद्याथ्र्यांनी केलेल्या पथसंचलनाचे कौतुक केले. त्यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेटच्या लोगोमधील इंम्पेथी, इंटेग्रिटी, व डिसीप्लीन या शब्दांचे अर्थ पटवुन सांगितले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. त्यांनतर स्टुडंट पोलीस कॅडेट प्रशिक्षणाकरीता आलेल्या काही विद्याथ्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी आपल्या संरक्षणाकरीता त्यांच्या प्राणाची आहुती दिली. तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पाच दिवसीय रेसीडेंशियल ट्रेनिंग कॅम्प हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असेल याशिबीरामध्ये काय- काय शिकायला मिळाले याबाबत सांगुन गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानलेे. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी आपल्या समारोपीय भाषणात विद्याथ्र्यांनी केलेल्या पथसंचलन व टेन्ट सुुशोभिकरणातील नाविन्यपुर्ण कल्पनेचे कौतुक करत विद्याथ्र्यंाना सांगीतले की, विद्याथ्र्यांना घडविण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक आणि पालक करत असतात. विदयार्थी हे मातीचा गोळा असुन त्याला मुर्ती बनवुन सजविण्याचे कार्य शिक्षक करत असतात विद्यार्थांनी आपले स्वप्न हे डोळे उघडे ठेवुन बघावेत आणि स्वप्न पुर्ण होई पर्यंत कठोर मेहनत करावे यासोबतच सर्व विद्याथ्र्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या शिबीरामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व कार्यक्रमामध्ये गुणानुक्रमाने क्रमांक पटकाविना­या शाळेच्या विद्याथ्र्याना पारितोषिक, रोख रक्कम व सन्मानचीन्ह देवुन गौरविण्यात आले. त्यामध्ये बेस्ट स्टुडंट कॅडेट पुरुष -पुष्कर पारधी, जवाहर नवोदय घोट, बेस्ट स्टुडंट कॅडेट महिला – सुशिला निकेसर, जि. प. हायस्कुल धानोरा, बेस्ट टेन्ट सुशोभिकरण – जि. प. हायस्कुल धानोरा, बेस्ट पथसंचालन – जवाहर नवोदय घोट व सर्वोत्कृष्ट संघ – जि. प. हायस्कुल धानोरा यांना रोख रक्कम, सन्मानचीन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच कबड्डी, व्हालीबॉल, 100 मी धावने, 400 मी. 4 न् 100 रीले, वक्तृत्व, गायन, समुहनृत्य, पथनाट¬, वाद-विवाद स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणा­या विदयाथ्र्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. यासोबतच सर्व सहभागी दहा शाळेमधील 300 विद्याथ्र्यांना ग्रुप फोटो व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

 

सदर कार्यक्रम मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख सा.,व अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम रमेश सा. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली श्री. मयुर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री. साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा श्री. सुजित क्षिरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी श्री. बापुराव दडस, व सर्व पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी व अंमलदार तसेच एस.पी.सी. समन्वयक अधिकारी, अंमलदार व शाळेतील समन्वयक शिक्षक यांचे उपस्थितीत पार पडला.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. श्री. धनंजय पाटील, पोउपनि श्री. भारत निकाळजे तसेच सर्व पोलीस अंमलदारांनी विशेष परीश्रम घेतले व कार्यक्रमाचे आभार प्रभारी अधिकारी जनसंपर्क कार्यालयाचे पोउपनि श्री. शिवराज लोखंडे यांनी मानले.

——————————