*प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपर्क अभियान बैठक संपन्न.*
*गडचिरोली:- दि. 30 डिसेंबर*
*श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या येथे पौष शुद्ध १२,सोमवार दि.२२ जानेवारी २०२४ ला भव्य दिव्य प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न होणार आहे.करिता स्थानिक आठवडी बाजार येथील हनुमान मंदिर येथे गडचिरोली तालुक्याची संपर्क अभियान बैठक संपन्न झाली.*
*यामध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण शहरातील तसेच प्रत्येक गावातील घरा-घरा पर्यन्त पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले.२२ जानेवारीला हर घर अक्षदा,हर घर भगवा…हर मंदिर मे राम,हर मंदिर अयोध्या..प्रमाणे प्रत्येक घरामध्ये,मंदिरात दिवे लावने,भजन करणे,मंदिरात रांगोळी व रोषणाई करून प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.*
*बैठीकला घिसूलाल काबरा,सौ.योगिताताई पिपरे मुक्तेश्वर काटवे,प्रतिभाताई चौधरी,वैष्णवीताई नैताम,विलास भांडेकर,मनोहर भांडेकर,प्रभाकर कोकोडे,बाबुराव झुवारे,भारत भांडेकर,गजानन डोंगर,पुष्पा कडकडे,विलास नेताम संघ स्वयंसेवक,विश्वहिंदु परिषद पदाधिकारी, बजरंग दल कार्यकर्ते,तालुक्यातील सर्व मंदिराचे पदाधिकारी,तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक,श्रीराम भक्तगण उपस्थित होते.*




