तारीख: ८ जानेवारी २०२४
भाकपा(cpi ) एटापल्ली यांनी दिल्ली ला जाऊन राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ,राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग आणि पी.संदोष कुमार खासदार (cpi) यांना दमकोंडवाही बचाओ तोडगट्टा खाणविरोधी निषेधाची निष्पक्ष चौकशीची केली मागणी
*एटापल्ली, महाराष्ट्र*: गडचिरोली, 08 जानेवारी 2024 – भाकपा एटापल्लीने खदान विरोधी आंदोलन दामकोंडवाही बचाओ तोडगट्टा चा आंदोलकांना झालेली अटक व दाखल गुन्हा ची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी ला निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील दामकोंडवाही पहाडी चा काठावरील तोडगट्टा गावात खदान विरोधी आंदोलन सुरू होते. या आंदोलनात महिला, पुरुष, तरुण, वृद्ध असे सर्वच घटक सहभागी होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना बेकायदेशीरपणे अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. असा अटक झालेल्या आंदोलकांचे म्हणणे आहे याची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आम्ही भाकपा (cpi)या निवेदनात आम्ही मागणी करतो की, आंदोलकांना झालेली अटक आणि दाखल गुन्हा यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच, आंदोलकांवर जर अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा. या प्रकरणाचा चौकशी होऊन अहवाल प्रसिद्ध व्हावे.
भाकपा (cpi) -कॉ. सचिन मोतकुरवार ता.सचिव भाकपा एटापल्ली