सोयाबीन काढतांना हलंबा मशीन मध्ये येऊन युवकाचा अपघाती मृत्यू
कलमगव्हान येथील घटना
वरोरा- तालुक्यातील बोर्डा येथील मृतक युवक हा सोयाबीन काढण्यासाठी मजूर म्हणून पुरुषोत्तम रामाजी गोंडे, बोर्डा यांच्या हलंबा मशीन असलेल्या ट्रॅक्टर वर गेला.परंतु,सोयाबीन काढतांना अचानक मृतकाचा डोक्याचा व छातीचा भाग मशीनमध्ये आतमध्ये गेल्याने त्याचा मृत्यू झाला.सदर घटना 15 फरवरी ला दुपारी 1,30 वाजताची सुमारास घडली.मृतकचे नाव – शेषराव बाळकृष्ण चौधरी वय 28 वर्ष,रा. बोर्डा,ता.वरोरा
मृतक हा बोर्डा येथील रहिवासी असून,अविवाहित होता.आई-वडीलाला एकुलता एक मुलगा होता. वृद्ध आई – वडिलांना अन्नाचे घास भरविण्यासाठी मृतक हा रोज रोजगाराचे शोधात असायचा.बोर्डा गावातीलच हलंबा मशीन मालक पुरुषोत्तम रामाजी गोंडे याने त्याला सोयाबीन काढण्यासाठी मजूर म्हणून कलंमगव्हान या गावात मशीन सह गेला मूळ शेती मालक वरोरा येथील मनोहर रोडबाजी झाडे याने कलमगव्हान येथील शेतकरी नाना ठोंबरे याला मागील तीन वर्ष्या पासून ठेक्याने करत होता.आज सोयाबीन काढतांना नेमके काही न कळता मृतकाच्या शरीराचा डोक्यापासून छातीपर्यंत चा भाग मशीनमध्ये गेल्याने मृतक शेषेराव याचा जागीच मृत्यू झाला.मृतक हा न्हावी समाजाचा असून त्याचे वडील दोन -तीन खेड्यामध्ये जाऊन आपला व्यवसाय करतात.एकुलता एक मुलगा गेल्यामुळे आई-वडिलांचा आधार गेला आणि त्यांच्या मनावर मोठा आघात झाला.बोर्डा गावात स्मशान शांतता पसरली आहे.
वरोरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून,मृतकचे शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.वृत्त लिहिपर्यंत शवविच्छेदन झाले नसून मृतकाच्या जवळच्या लोकांनी नुकसान भरपाई मागत असल्याचे कळते.