Home Breaking News *सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास व मोदी की ग्यारंटी हाच...

*सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास व मोदी की ग्यारंटी हाच महायुतीचा संकल्प*

87

*सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास व मोदी की ग्यारंटी हाच महायुतीचा संकल्प*

 

*लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे प्रतिपादन*

 

*महायुतीचा गडचिरोली जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न*

 

*गडचिरोली:-दि.15 जानेवारी*

 

*संपूर्ण भारत देशाततील महिला,शेतकरी, कामगार आणि युवक यांना केंद्रस्थानी ठेऊन विकसित भारत जगातील आर्थिकदृष्ट्या भारत ताकदवर घडविण्यासाठीचे काम मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केले आहे. मागील 10 वर्षांमध्ये किसान सन्मान योजना, कामगार योजना, युवकांना उद्योग, महिलांना लोकसभा व विधानसभेत प्रतिनिधित्व देणारा निर्णय, मुस्लिम महिलांना त्रीपल तलाक पासुन सुटका देणारा,10 कोटी गरीब महिलांना मोफत गॅस,घरकुल,सौचालय,24 कोटी गरीब महिलांचे खाते अशा अनेक योजना अमलात आणलीत.यामुळे सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास,सबका प्रयास व मोदी की ग्यारंटी हाच महायुतीचा संकल्प असेल असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे यांनी केले.*

 

*स्थानिक धानोरा रोडवरील महाराजा सभागृह येथे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस,आर.पि.आय.व ईतर 12 घटक पक्षाचा गडचिरोली जिल्हास्तरीय महायुती कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी महायुतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.*

 

 

*याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील,अन्न व औषध प्राशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम,खासदार अशोकजी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. देवरावजी होळी,आमदार कृष्णाजी गजभे,जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे,भाजपा जिल्हा महामंत्री सौ.योगीताताई पिपरे,भाजपा किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, रविंद्रजी ओल्लारवार,शिवसेना जिल्हाध्यक्ष राकेश बेलसरे,शिवसेना संपर्क प्रमुख हेमंत जंबेवार,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,आर.पी.आय. कवाडे गटाचे उपाध्यक्ष मुरलीधर भानारकर,कवाडे गटाचे जिल्हाउपाध्यक्ष मारोती भैसारे,प्रहार संघटनेचे निखिल धार्मिक,आठवले गटाचे घुटके,भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अमिता मडावी,शिवसेनेच्या ईष्ठामताई महायुती आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

 

*कार्यक्रमाचे सूत्र-संचालन भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम तर आभार भाजपा जिल्हा महामंत्री सदानंद कुथे यांनी मानले.*

Don`t copy text!