*शालेय पोषण आहार कर्मचारीच्या मेळाव्याला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

17

*शालेय पोषण आहार कर्मचारीच्या मेळाव्याला माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची उपस्थिती*

 

*शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून आलापल्ली येथे मेळाव्याचे आयोजन*

 

*◆अहेरी◆*:आलापल्ली येथील ग्राम पंचायत च्या सभागृहात शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन कडून विविध मागण्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी उपस्थित राहून मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानावरून शालेय पोषण आहार कर्मचारी यांना वेतनवाढ,पदोन्नती,आरोग्यविमा व सेवा निवृत्तीवेतन या विषयांवर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व शासन दरबारी आपल्या समस्या मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्याला युनियन राज्य सचिव विनोद जोडगे,जिल्हा संघटक सचिन मोतकूरवर,सूरज जक्कुलवार, जुबेदा शेख,आकाश तेलकुंटलवर,गणेश चापले सह अहेरी उपविभातील शेकडो शालेय आहार पोषण कर्मचारी उपस्थित होते.