*अहेरी तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

21

*अहेरी तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण*

 

 

*जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळ किष्टापुर (वेल) कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते*

 

*◆अहेरी◆* :तालुक्यातील किष्टापुर (वेल) येथे जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या बक्षीस वितरण सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे सरपंच किशोर आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगुर ग्रामपंचायत चे उपसरपंच उमेश मोहूर्ले,किष्टापुर ग्रामपंचायत चे उपसरपंच जीवन आत्राम,पोलीस पाटील महेश अर्का,माजी सरपंच भगवान आत्राम,हरिदास आत्राम,काशिनाथ दब्बा,अनिल दब्बा,मधुकर सडमेक,अजय मडावी,ग्रामपंचायत सदस्य रोहित गलबले,बंडुजी नागोसे,साईनाथ नागोसे,जुलेख शेख,प्रवीण रेषे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी क्रिकेट खेळाविषयी खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

टेनिस बॉल क्रिकेट सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्याकडून तर द्वितीय पुरस्कार माजी जि.प.सदस्या अनिताताई दिपकदादा आत्राम तसेच तृतीय पुरस्कार सरपंच किशोर आत्राम व उपसरपंच उमेश मोहूर्ले यांच्या कडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले होते.

 

जय विर बाबुराव शेडमाके क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हरिदास आत्राम यांनी मानले.या टेनिस बॉल सामन्याचे बक्षीस वितरण सोहळ्याला किष्टापुर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सामन्याच्या यशस्वीतेसाठी केतन मडावी,गौतम गावडे,प्रकाश दब्बा,रोहित अर्का,कमलेश अर्का,जीवन आत्राम,भगत आत्राम,अनिकेत सडमेक,यश दब्बा,आदर्श आत्राम,करण दब्बा सह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.