*जनतेने जनकल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा.* _संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांचे आवाहन_

104

*जनतेने जनकल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा.*

_संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर यांचे आवाहन_

——————————————-

*संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर यांनी जाणून घेतल्या गोविंदपुर वासियांच्या समस्या.*

——————————————

*_संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांची गोविंदपुर येथे सदिच्छ भेट_.*

 

दिनांक :- 07 /02/2024

 

गडचिरोली :- भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात राबवत असलेल्या गाव गाव चलो अभियानाची सुरुवात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यात करण्यात आलेली आहे.

गाव गावचे लोक अभियानाचे औचित्य साधून विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांनी गोविंदपुर येथे सदिच्छा भेट दिले.

डॉक्टर उपेंद्र जी कोठेकर यांनी गोविंदपुर येथील नागरिकांना संबोधित करताना बोलले की, देशाचे लाडके पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सामान्य जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी मुलींसाठी,विविध प्रकारच्या योजना काढलेले आहेत. पी एम किसान योजना, उज्वला गॅस योजना, आयुष्यमान भारत योजना, विश्वकर्मा योजना, जल जीवन मिशन योजना, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी, पीएम आवास अशा विविध जनकल्याणकारी योजना माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी सामान्य जनतेसाठी काढलेल्या आहे. तरी आपण सर्वांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहान केले. तसेच डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांनी गोविंदपुर वासियांना उत्कृष्ट व लाभदायक मार्गदर्शन केले.

गोविंदपुर वासियांनी डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांच्याकडे आपल्या गावामध्ये होत असलेल्या विविध समस्या मांडले. व डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांनी गोविंदपुर वासियांना आश्वासन देत आपल्या सर्व समस्या लवकरात लवकर वरिष्ठानकडून व स्थानिक खासदार,आमदार यांच्या कडून सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.

त्याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, आमदार डॉ.देवरावजी होळी, लोकसभा विस्तारक तथा ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, गाव गाव चलो अभियान जिल्हा संयोजक तथा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, विधानसभा विस्तारक दामोदरजी अरगेला, जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खट्टी, तालुकाध्यक्ष विलास पाटील भांडेकर, बूथ प्रमुख किसनजी गेडाम, उपसरपंच प्रीतमजी गेडाम, भूत प्रमुख देवरावजी सातपुते व गावातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.