गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले

483

काल संध्याकाळी एक विश्वासार्ह माहिती मिळाली की काही सशस्त्र नक्षलवादी कॅडर कांकेर – नारायणपूर – गडचिरोली जाणाऱ्या त्रिकोणी रस्त्याच्या पॉइंटवरील वांगेतुरीपासून 7 किमी पूर्वेला हिद्दूर गावात विध्वंसक कारवाया करण्यासाठी व नव्याने उघडलेल्या पो.स्टे.वांगेतुरी आणि पो.म.के.गर्देवाडा या आउट पोस्टची रेकी करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून आहेत

त्यावरून मा अप्पर पोलीस अधीक्षक अभियान श्री.यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चार C-60 पार्ट्यांचा समावेश असलेले एक पथक सदर भागात शोध मोहिमेवर पाठवण्यात आले सदर पथक हिद्दूर गावापूर्वी 500 मीटर अंतरावर असताना त्यांचेवर सुमारे 19:00 वाजता जोरदार नक्षल्यांकडून गोळीबार करण्यात आला त्याला गडचिरोली पोलीस दलाने प्रत्युत्तर दिल्यावर घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून गेले. परिसरात झडती घेतली असता – पिट्टू, स्फोटक साहित्य, वायरचे बंडल, आयईडी बॅटरी, डिटोनेटर्स, क्लेमोर माइन्सचे हुक, सोलर पॅनेल आणि नक्षल साहित्य इत्यादी मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबवले जात आहे