सोनार समाज गडचिरोली ची विशेष सभा संपन्न
गडचिरोली – नुकत्याच झालेल्या सोनार समाज गडचिरोली ची विशेष सभा दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोज बुधवार ला श्री शिव मंदिर, पंचवटिनगर गडचिरोली येथे ठरविण्यात आलेली होती. या सभेमध्ये संत श्री नरहरी महाराज सोनार पुण्यतिथी निमित्त नियोजन ठरविण्यात आले व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये सोनार समाजाचे अध्यक्ष नितीन हर्षे यांनी मार्गदर्शन केले तसेच अनेक सदस्यांनी मार्गदर्शन केले.
या सभेला सोनार समाजाचे सचिव प्रा. राकेश इनकणे, कोषाध्यक्ष रमेश भरणे, सहसचिव तानाजी पालकर, महिला अध्यक्ष अल्का ताई खरवडे, सुरेश भोजापुरे, मार्गदर्शक बंडू कारेमोरे, यादवराव हर्षे, टिकाराम करंडे, पंकज हर्षे,श्री.बहानंद हर्षे, जगदीश डोमळे, प्रमोद बेहरे, सचिन हर्षे, अशोक खरवडे, अक्षय हर्षे, मंगेश हर्षे, नरेंद्र डोमळे, तसेच महिला सदस्य सविता डोमळे, मंजुषा पालकर, मायाबाई भोजापुरे, स्नेहा डोमळे, दर्शना डोमळे, ज्योती खरवडे, वृषाली हर्षे, प्रिती हर्षे, छाया हर्षे, वैशाली करंडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे आभार सोनार समाजाचे सचिव प्रा.राकेश इनकणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानाजी पालकर, पंकज हर्षे व समाजातील महिलानी प्रत्यक्ष मदत केली.