राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार जिल्हा गडचिरोली तर्फे निषेध आंदोलन
आज दिनांक ८/२/२०२४ रोजी गडचिरोली शहरातील स्थानिक इंदिरा गांधी चौकात दुपारी २.०० राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचे नेतृत्वात शेकडो गडचिरोली – पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थितीत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या बाबत नुकताच निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या संबंधाने निवडणूक आयोगाच्या विरोधात निषेध आंदोलन करून संताप व्यक्त केला. यावेळी आमचा पक्ष शरद पवार, आमचा चिन्ह शरद पवार, निवडणूक आयोगाचा निषेध असो, अशा विविध घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, विजय गोरडवार गडचिरोली शहराध्यक्ष, नईन शेख जिल्हा उपाध्यक्ष, शेमदेव चाफले जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, मोहन पाल तालुकाध्यक्ष, हुसेन शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, इंद्रपाल गेडाम जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, संध्या उईके माजी नगरसेविका, मीनल चिमूरकर माजी नगरसेविका, प्रमिला रामटेके महिला जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, नीता बोबाटे महिला तालुकाध्यक्ष, सुनील कत्रोजवार तालुका अध्यक्ष सेवादल, सुनील चिमूरकर उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, मल्लया कालवा शहराध्यक्ष सेवादल, मोनू पठाण युवा कार्यकर्ते, परशुराम मेश्राम कार्यकर्ते, रामचंद्र भांडेकर कार्यकर्ते, नरेश कंदीकुरवार तालुका उपाध्यक्ष, रेखा कोराम जिल्हा महिला सचिव, जैनब शेख महिला कार्यकर्त्या, लता शेंडे,शाहरुख पठाण शहराध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग, आसिफ कुरेशी, तजमुल हुसेन, इम्रान पठाण, तेजराव नेतनकर, सुरेश जोंधळे, अमान सय्यद, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते