*माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने आयोजित सिरोंच्या येथील भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.*
*भाजप तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते विजेत्या संघाला बक्षीस वितरण..!*
*सिरोंच्या:-* स्थानिक एफ सी डी मैदान येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने बी जे पी चषक क्रिकेट क्लब सिरोच्या यांच्या सौजन्याने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले होते.
तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजप तालुका अध्यक्ष (ग्रामीण) शंकर नरहरी तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर तालुका अध्यक्ष दिलीप सेनागरपु,सत्यनारायण मंचालवार,जिल्हा सचिव संदीप राचार्लवार,भाजप प्रकोष्ठ अध्यक्ष संतोष पडलवार,रंगू बापन्ना,रमेश मुग्गीवार,सितापट्टी गट्टू,संपत दया, संदीप गंजीवार हे होते.त्यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मोठ्या प्रमाणावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी स्पर्धकानीं सहभाग नोंदविला होता.
क्रिकेट स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी भाजप पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 50000/-(पन्नास हजार रुपये) माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या तर्फे देण्यात आले.तर द्वितीय क्रमांक विजेत्या संघाला ट्रॉफी व 30000/-(तीस हजार रुपये) भारतीय जनता पक्षाच्या सिरोच्या तालुका पदाधिकारी यांचे तर्फे बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमाला सिरोंच्यात तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी,स्थानिक कार्यकर्ते,क्रिकेट स्पर्धक व प्रतिष्ठित नागरिक,युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..!